“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

नवी दिल्ली : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान केले पाहिजे.’ असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही ‘मुख्यमंत्र्यांनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत’, असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का? असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांच्या या प्रश्नाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोणत्याही गोष्टीवर निरर्थक बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, कोणी प्रश्न तर त्याला उत्तर देण्यास मी बांधिल नाही.

मी काय बोललो ते आधी समजून घ्यावे. या देशात एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाही का? भाजपच्या काळात अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का? भाजपने राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा योग्य अभ्यास करून भाष्य करा, असा माझा त्यांना सल्ला आहे.कुठल्याही गोष्टीवर काहीही बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

तसेच आज पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा