‘आम्ही सुद्धा संयमानं बाॅम्ब टाकणार’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

सांगली : एकीकडे राज्यात शिवसेना आणि राणे वाद चांगलाच पेटला आहे. या वादात भाजपही राणेंच्या समर्थनार्थ उतरली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चालले, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केला.

महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कोणीच लक्ष दिले नाही . तसेच आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही कोलमडून पडू असे त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी दिला.

तसेच यावेळी बोलताना आमच्याकडून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचे काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीने केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा