‘आम्ही सुद्धा संयमानं बाॅम्ब टाकणार’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
सांगली : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. एकीकडे राज्यात शिवसेना आणि राणे वाद चांगलाच पेटला आहे. या वादात भाजपही राणेंच्या समर्थनार्थ उतरली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चालले, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केला.
महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कोणीच लक्ष दिले नाही . तसेच आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही कोलमडून पडू असे त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी दिला.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या विषयावर विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी शरद पवारांची शिकवणी लावावी”
- मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो, त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, तो मी टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार !
- ‘वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही’; राणेंचा इशारा
- ‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान
- ‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला