”आमचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास, ते आमचा मान ठेवतील”

मुंबई : काल महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली.

यानंतर आता भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. एखाद्या राजकीय नेत्याच्या निधनानंतर त्याच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सहसा विरोधी पक्ष आपला उमेदवार देत नाही. त्यामुळेच यावेळी सुद्धा भाजपने आपला उमेदवार मागे घेत राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.

यानंतर पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्राची पंरपरा राहिली आहे की, निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा, ही विनंती आम्ही फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की, आमच्या विनंतीला मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. त्याचबरोबर संघटनेत चर्चा करून फडणवीस निर्णय घेतील असं फडणवीसांनी सांगितल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा