“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांना दमदार विजय मिळवून दिला. आता प्रशांत किशोर यांनी काल सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर चाललेल्या 3 तासाच्या या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात काहीतरी मोठं घडणार असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीनंतर शिवसेना खारदार अरविंद सावंत म्हणाले, “काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं आहे. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झाली आहे. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. तर केंद्रात देखील भाजपला समोर एक नवा चेहरा उभा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता केंद्रात आता सत्ता समिकरणं बदलणार का? असा नवा प्रश्न राजकीय वर्तुळात उभा राहत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा