१०० दिवस काय, १०० आठवडे किंवा १०० महिने आम्ही हे शेतकरी आंदोलन ठेवणार !

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. ०६ मार्च २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काळे झेंडे दाखवणे आणि केएमपी एक्स्प्रेस वे जाम करण्याचा निर्धार शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

यानंतर आता आशा गमावू नका, १०० दिवस झाले आहेत. १०० आठवडे किंवा १०० महिने जरी लागले तरी जोपर्यंत सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरूच ठेवणार आहोत,असे आश्वासन कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज दिले आहे.

तसेच शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे त्यांना मान्य नसून, ते रद्द करण्याची त्यांची मागणी कायम आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रिये मुळे आंदोलक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे मानण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.