आम्ही घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे सांगणार – मोहन भागवत

देशभरात निवडणुकीचा गोंधळ असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या बाजूने प्रचारात उडी घेतली आहे. संघ स्वयंसेवक आता घरोघरी जाऊन नोटाबंदीचे फायदे आणि ईव्हीएममधील नोटा पर्यायाचे नुकसान सांगणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतीच विभाग प्रचारक वर्गाची प्रशिक्षण बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती आहे. नोटाबंदीबाबत खोटा प्रचार केला जात आहे. त्यामुळे या खोट्या प्रचाराला रोखण्यासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास सांगा, असं भागवत यांनी सांगितल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.