असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही ; मनसेचा शिवसेनेला इशारा

सरचिटणीस यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी पत्रकार परिषदेत यांनी शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे.

राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरेंचे निधन

या नोटीसचा फोटो ट्विट करत असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली ,पगार कपात झाला असल्यास मनसेशी संपर्क साधा

महापालिकेच्या भ्रष्टाचारात बरेचसे लोक भरेडले जात आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मृतदेह बॅग्स खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. या बॅग्सची किंमत काय ते महापालिकेने ठरवावं. पण कमी गुणवत्तेच्या बॅग्स घेऊन मंबईकरांच्या जीवाशी खेळू नये, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.