InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दुबळे नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांना घाबरतात, राहुल गांधींची मोदींवर टीका

- Advertisement -

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने अडथळा घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला.

याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतं तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही. नरेंद्र मोदी यांची चीन बरोबरची कुटनिती ही, शी जिनपिंग यांच्याबरोबर  गुजरातमध्ये जाऊन झोका घेणे, दिल्लीमध्ये घळाभेट करणे, चीनमध्ये शी जिनपिंग समोर मान तुकवणे येवढीच आहे. ’

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.