देवीचा फोटो असलेले कपडे घालणे प्रियंकाला पडले महागात

देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता प्रियांका एका जून्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. प्रियांकाचा नवरा अमेरिकेचा लोकप्रिय गायक याने २९ फेब्रुवारी २०२० रोजी एक फोटो शेअर केला होता. हाच फोटो पुन्हा एकदा प्रियांकाच्या इन्स्टाग्रामवरील प्रियंकाचे क्लोसेट या फॅन अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

फोटोत प्रियांकाने लाल रंगाचं एक बोहेमियन जॅकेट घातलेला आहे. तर या जॅकेटवर मॉं कालीचा फोटो पाहायला मिळतं आहे. या फोटोवरून प्रियांकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

त्यावर युजर्स ट्रोल करत बोलले की, “देव फॅशनसाठी नाही, देवीचा अपमान करू नका” खूप वाईट केले हे, देवा माफ कर यांना. एवढेच बोलून प्रियंकाला ट्रोल करणे थांबले नाही तर, “आपल्या शरीरावर देवाचे वस्त्र परिधान करु नका कारण देव पवित्र आहे, आणि तुला कुटुंब आहे काही तरी विचार कर.”असे देखील कंमेंट फोटोवर करण्यात आले, तर कोणी धर्माचा अपमान करू नका असे बोलत प्रियंकाला ट्रोल केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा