Weather Update | उत्तर भारतात गारपिटीचा इशारा, तर देशात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती!
Weather Update | सध्या देशातील वातावरण सतत बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस (rain) तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. तसचं गेल्या 1महिन्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नकोस केलं आहे. यातच हवामान विभागाने (Meteorological Department) महत्वाची माहिती दिली आहे. उत्तर भारतात गारपीट होण्याची शकता तर पुढील पाच दिवसात देशाच्या अनेक भागात पाऊस पडणार आल्याचा इशारा दिला आहे. यामध्ये विदर्भ, छत्तीसगड, आणि पश्चिम मध्य प्रदेश अशा अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचप्रमाणे उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात विजांच्या कडकडासह जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचं हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतात विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस (Heavy rain with thundershowers over East India)
तसचं हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पूर्व भारतात विजांचा गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या या राज्यातील अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 मे आणि 2 मे रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा आणि 1 मे ते 4 मे दरम्यान आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीपासून आपली पिके वाचवण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ( Heavy rains in ‘these’ states)
दरम्यान, आज (1मे ) ला रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर दक्षिण भारतात देखील पुढील पाच दिवस महत्वाचे असून वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या या राज्यामध्ये देखील 30 एप्रिल ते 2 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Nitesh Rane – राजकाराणातली गंगुबाई ( संजय राऊत ) खुप बोलली एकले – नितेश राणे
- Fisheries Department | मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Gujrat High Court | गुजरात हायकोर्टात मेगा भरती! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- State Bank Of India | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Beed | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 पैकी 5 जागा
Comments are closed.