Weather Update | उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही ठिकाणी गारपीट (Hail) झाली आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

18 एप्रिलपासून अवकाळी पावसाला सुरुवात (Unseasonal rains started from April 18)

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Punjabrao Dakh Weather Update), राज्यामध्ये 18 एप्रिलपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यात 18, 19 आणि 20 एप्रिल 2023 रोजी बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहे.

मे महिन्यात पावसाची शक्यता (Chance of rain in May)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यात थैमान (Weather Update) घातले आहे. तर, मे महिन्यात देखील राज्यात पावसाची शक्यता आहे. 15 मे नंतर राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण उन्हाळा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली होती. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या