Weather Update | कुठे तीव्र उन्हाळा, तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही भागांमध्ये पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशा देशात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. देशात राजधानी दिल्लीसह अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), देशातील बहुतांश राज्यांमध्ये या आठवड्यात हवामान स्वच्छ राहील. तर 13 मे रोजी देशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसामुळे तापमानात घट होणार नसल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या वातावरणात नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place)

देशातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिसा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर या राज्यामध्ये मोचा चक्रीवादळाचा धोका कायम आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ आणखी तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘या’ ठिकाणी वाढणार तापमानाचा पारा (The mercury of temperature will increase in ‘this’ place)

राजस्थानमध्ये येत्या काही दिवसात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राजस्थानसोबतच उत्तर प्रदेशमध्ये तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात राज्यात हळूहळू उष्णता वाढणार असल्याचा हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like