Weather Update | कुठे थंडी तर कुठे पाऊस, वाचा हवामान अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सतत वातावरणामध्ये (Weather) बदल होत आहे. राज्यसह देशामध्ये कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. तर, काही ठिकाणी जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यामध्ये देखील चांगलाच गारठा वाढत चालला आहे. त्यामुळे जागोजागीशी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.
देशात एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कहर वाढत चालला आहे. तर, दुसरीकडे दक्षिण भारतासह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तमिळनाडू राज्यासह दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटक, केरळ आणि नागालँडमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला आहे.
हवामान अंदाजानुसार, पुढील 24 तास हरियाणा, पंजाब, उत्तर राजस्थान आणि दिल्लीतील काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये -4 किमान तापमानाची नोंद झाली आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत गोठले आहे. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सध्या राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढत चालला आहे. नाशिक, पुणे आणि औरंगाबादमध्ये तापमानात वेगाने घसरण होत आहे. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण भागांमध्ये दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. राज्यात वाढलेली थंडी शेतकऱ्यांना थोडा दिलासा देत आहे. कारण रब्बी पिकांसाठी ही थंडी चांगली आहे. वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना गहू, मक्का आणि इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकातून फायदा होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | पुतीन, बायडेन, चार्ल्स, झेलेन्स्की यांच्याकडून उद्धव ठाकरे कोण विचारणा ; संजय राऊतांचा दावा
- Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची सुटका, आर्थर रोड कारागृहाबाहेर राष्ट्रवादीचा जल्लोष
- Winter Session 2022 | विधानसभेत लोकायुक्त विधेयक मंजूर, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ येणार लोकपालच्या कक्षेत
- Devendra Fadnavis | TET घोटाळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांकडून अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट
- Devendra Fadnavis | ‘टीईटी’संदर्भात चौकशी करणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.