Weather Update | कोकणकरांनो सावध! आर्द्रतेमुळे वाढणार ‘हीट इंडेक्स’

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशात कोकण भागात आर्द्रतेसह तीव्र उन्हामुळे हीट इंडेक्स (Heat Index) वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही येत्या दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मोचा चक्रीवादळामुळे राज्यातील हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे उष्णतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अधिक प्रमाणात राहणार आहे. 14 मे पर्यंत कोकणात हीट इंडेक्स वाढल्यामुळे वातावरण अस्वस्थ करणारे राहू शकते.

पश्चिम बंगाल उपसागरामध्ये मोचा चक्रीवादळाचा वेग ताशी 120 ते 130 किलोमीटर इतका वाढला आहे. त्यामुळे त्या भागात उष्णतेसह जोरदार पाऊस पडत आहे. या वादळाने वातावरणातील आर्द्रता शोषून घेतल्याने देशात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिसा या भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा (Weather Update) हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान होता. या वादळामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like