Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील कमाल तापमान (Temprature) दिवसेंदिवस चांगलेच वाढत चालले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा चांगलाच तापणार आहे. पुढील 48 तास विदर्भ, कोकण आणि मुंबईच्या काही भागात उष्णतेच्या झळांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील काही तास तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन सतत हवामान विभागाकडून केले जात आहे.
विदर्भासह कोकणाला हवामान खात्याचा इशारा (Meteorological department warning for Konkan including Vidarbha)
रत्नागिरी, रायगड, मुंबई या भागात तापमानाचा (Weather Update) पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर नागपूरमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण उन्हाळा ऋतू अद्याप सुरू झालेला नाही. फेब्रुवारीमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर, ऐन उन्हाळ्यात म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात परिस्थिती किती भीषण असेल या विचारानं अनेकांना घाबरवलं आहे.
साधारणता होळीनंतर तापमानात (Weather Update) वाढ होण्याची शक्यता असते. मात्र, यंदा 15 फेब्रुवारी नंतरच तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच गरम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, थंडी संपतात लगेच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “तुम्ही गृहमंत्री आहात याचं भान ठेवा”; संजय राऊतांचे फडणवीसांना खडेबोल
- Mahadev Jankar | “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष”; जानकरांची बोचरी टीका
- Sanjay Raut | “हे सुपारी बाजांचं राज्य आहे का?”; संजय राऊतांचा संतप्त सवाल
- Shivsena | मोठी बातमी: उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा पाठिंबा
- Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”