Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान खात्याचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी गारपिटीने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर 22 एप्रिलपर्यंत म्हणजेच शनिवारी राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. असं असलं तरी कोकणाच्या उत्तरेकडील भागात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणासह नवी मुंबई आणि ठाणे भागामध्ये तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागामध्ये तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

अनेक ठिकाणी विजांसह पावसाची हजेरी (Rain with lightning at many places)

राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. नागपूरमध्ये काही भागात वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. तर भंडारा, सांगली, मिरजला देखील पावसानं चांगलं झोडपलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड आणि वारजे परिसरात गारपीट झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये नागालँड, मेघालय, सिक्कीम, आसाम आणि पंजाबमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर जम्मू काश्मीर, उत्तराखंड या भागातही हलक्या सरी बसण्याचा इशारा हवामान खात्याकडून आला आहे. पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी देखील होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्वाच्या बातम्या