Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाच्या झळा (Summer heat) वाढत चालल्या आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
बंगाल उपसागराच्या अग्नेय भागामध्ये पुढील दोन दिवस चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. यामुळे बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
‘या’ ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert for rain at ‘this’ place)
राज्यामध्ये पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, नांदेड, अहमदनगर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे, हिंगोली, उस्मानाबाद या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी (Weather Update) करण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाच्या प्रभावामुळे राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यामध्ये कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये लक्षणीय घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे. तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane | शरद पवार राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा ! – नारायण राणे
- Anjali Damania | अंजली दमानिया यांची शरद पवारांच्या राजीनाम्यावर आरोप करत प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- Sanjay Raut | ” जिथे ठाकरे तिथं शिवसेना तसचं जिथं शरद पवार तिथं राष्ट्रवादी काँग्रेस” : संजय राऊत
- Ajit Pawar | थांब रे बाबा, दादा पादा; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
- Ajit Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम ! अजित पवारांनी केला खुलासा