Weather Update | पुण्यात पावसाची हजेरी, तर मुंबई, ठाणे भागांत जोरदार पाऊस
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. तर आज (21 मार्च) पुण्यासह मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
पुण्यात पावसाची हजेरी (Rain in Pune)
पुणे शहरामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सकाळी 11 च्या सुमारास पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावली. शहरातील वातावरणात सध्या सातत्याने बदल (Weather Update) होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन खात्याकडून सातत्याने केले जात आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai)
मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतुकीतही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईकरांसह पुणेकरांना देखील आज बदलत्या हवामानाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)
राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे .
महत्वाच्या बातम्या
- Orange Benefits | उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Triphala Churna | रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Weather Update | विदर्भात अवकाळी पावसाचं संकट कायम, तर पुण्यात वाढणार तापमानाचा पारा
- Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
Comments are closed.