Weather Update | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रात (Maharashtra) किमान तापमान (Temprature) दिवसेंदिवस वाढ होत चालली असून थंडी (Cold) कमी होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये उन्हाचा तडाका चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहेत. परिणामी उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. तर, उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. हवामान विभागाकडून उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशात 16 फेब्रुवारीपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काश्मीर, लडाख आणि गिलगिटमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या भागात पावसासह जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मैदानी भागातील तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. आणखी दोन दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा पारा घसरू  शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. निफाड आणि सोलापूरमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमान (Weather Update) नोंदवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कमाल आणि किमान तापमानात 13 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आली आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे.

महत्वाच्या बातम्या