Weather Update | मुंबईतील तापमानात वाढ, तर राज्यात अवकाळी पावसाचं संकट
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये बहुतांश भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील काही भागांना गारपिटीने झोडपलं आहे, तर अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या बदलत्या वातावरणाचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण असताना मुंबईत अचानक तापमानात वाढ झाली आहे.
सोमवारी मुंबईमध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा सूर्य देवाने दर्शन दिलं. जशी-जशी वेळ सरत होती तसं-तसं शहरातील तापमान वाढतं चाललं होतं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), मुंबईमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. देशातील हे सर्वात उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये हवामानात फारसे बदल न होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. मध्य भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कमाल तापमानात थोडी वाढ होऊ शकते. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गुजरात, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये तापमानाचा पारा 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढू शकतो.
11 ते 13 मार्चपासून देशातील तापमानात बदल होण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर येत्या 24 तासात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???; फडणवीस, बावनकुळेंकडून ठाकरेंना साद
- Sushma Andhare | “शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”; सुषमा अंधारेंची कदमांवर जहरी टीका
- Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार
- Job Opportunities | नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
- Chandrashekhar Bawankule | “राऊतांनी आमच्या हातात हात मिळवून महाराष्ट्राला…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.