Weather Update | मोचा चक्रीवादळ सक्रिय! विदर्भ आणि मराठवाड्यासह ‘या’ ठिकाणी पावसाचा अलर्ट
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) थैमान घालत आहे. कारण पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोचा चक्रीवादळ (Cyclone Mocha) सक्रिय झालं आहे. या वादळामुळे देशात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हे या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ असून पर्यटकांना आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला. तर आता चक्रीवादळामुळे मे महिन्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे आतापर्यंत तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली राहिला आहे.
आज या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण छत्तीसगड, ओडीसा, लक्षद्वीप, तेलंगाना, आंध्र प्रदेश या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 15 मे पर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 9 मे पर्यंत हवेचा दाब तीव्र राहू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार
- Nana Patole | राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आमचे उमेदवार परत करावे, नाना पटोले यांनी केली मागणी
- Ajit Pawar Vs Eknath Shinde | अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली; म्हणाले..
- Ajit Pawar | अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका; म्हणाले …
- Abdul Sattar | “आम्ही कुत्रा असेल तर संजय राऊत महाकुत्रा”; अब्दुल सत्तारांचं टीकास्त्र
Comments are closed.