Weather Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसासह राज्यामध्ये उन्हाचा तडाखाही वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढचे चार दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता (There is a possibility of rainy weather for the next four days)

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून पुढचे चार दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये विजांसह वादळी पाऊस होईल, असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील हवामान विभागाने दिल्या आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे.

‘या’ पावसाचा येलो अलर्ट जारी (Yellow alert issued for ‘this’ rain)

राज्यामध्ये जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असून लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या