Weather Update | ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही ठिकाणी गारपीट (hail) झाली आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये बीड, सोलापूर, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे.

राज्यामध्ये विजांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी उर्वरित कामं लवकरात लवकर उरकून घ्यावी, असे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. कारण वरील जिल्हे वगळता उर्वरित राज्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

29 आणि 30 एप्रिल रोजी सांगली, सातारा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या