Weather Update | ‘या’ राज्यांना पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सातत्याने वातावरण (Weather) मध्ये बदल होत आहे. देशामध्ये परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. मात्र, तरीही देशातील अनेक राज्यात पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचे चित्र समोर येत आहे. भारतातील उत्तर भागात अनेक ठिकाणी पाऊस पडत नसला तरी भारतातील दक्षिण राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातली आहे. दक्षिण भारतामध्ये सध्या ईशान्य मोसमी वारे सक्रिय असल्यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी या भागांमध्ये पुढील पाच दिवस हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ राज्यांना पावसाचा इशारा
भारतातील दक्षिण भागातील काही राज्यांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, 3 ते 7 सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये तामिळनाडू, पुदूच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विजांच्या कडकाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतातील उत्तर भागातील जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश या भागांमध्ये 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान बर्फवृष्टीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काश्मीर खोऱ्यामध्ये 6 नोव्हेंबर मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परिणामी डोंगराळ भागात आणखीनच थंडी वाढण्याची शक्यता आहे.
बदलत्या वातावरण (Weather) मुळे या राज्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
बदलत्या वातावरणामुळे तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम जिल्ह्यात तंजावर, तिरुवरूर मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुंद्रथूर या शहरांमध्ये दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये देखील पुढील दोन दिवस शाळा बंद ठेवण्यात आले आहे. साउथ तर चेन्नईमध्ये देखील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये 8 नोव्हेंबर पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह उत्तर भारतात वाढला थंडीचा जोर
देशात महाराष्ट्रासह उत्तर भारतातील थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, राजस्थान उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये गेल्या काही दिवसापासून हवामान कोरडे असून थंडीचा कडाका वाढला आहे. या ठिकाणी तापमानात घट झाली असून दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. मात्र, रात्री परत थंडीचा जोड वाढत आहे. दरम्यान, या राज्यांमध्ये रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | “मी काय दहशतवादी किंवा गुंड आहे का?”, सवाल करत सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संताप
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा बदला ‘या’ मराठ्या मर्दाने घेतला”, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान
- Eknath Shinde | ‘शिंदे गट’ भाजपमध्ये जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
- Chandrakant Patil | “अजित पवार यांची निधी वाटपातील असमानता आम्ही रोखली”
- Nana Patole | “आईला भेटाया गेले की नरेंद्र मोदी कॅमेराकडे बघून फोटो काढतात, पण राहुल गांधी…”, नाना पटोलेंचा पंतप्रधानांना टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.