Weather Update | राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात (Climate change) सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा (Temperature) पारा चांगला चढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतन सापडला आहे. त्याचबरोबर या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy rain in this district)

राज्यात नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसराला पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे. या ठिकाणी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे शेतामध्ये पाणी तुंबले आहे. त्यामुळे शेतीतील रब्बी हंगाम म्हणजेच गहू, कांदा, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये गारपिट झाली आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर आणि सिंदखेड तालुक्यामध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शनिवारी जळगावच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद, पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला, भंडारा, जळगाव, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

राज्यामध्ये 8 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर 7 मार्च रोजी मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये देखील आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.