Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपिट (Hail) झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात अवकळी पावसाची हजेरी (Heavy rains in Dhule district)

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीनं झोडपलं  आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात 15 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग सहा दिवस (रविवारपर्यंत) अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गहू, मका, बाजरी इत्यादी पिकं उध्वस्त झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. या हवामानामुळे (Weather Update) गहू, हरभरे, संत्रा या पिकांना मोठा फटका बसला आहे. तर नागपूरमध्येही विजांसह अवकाळी पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात (Weather Update) सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या