Weather Update | राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी गारपीटीने (Hail) धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढचे तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

राज्यामध्ये २० मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता (Chance of rain in Marathwada and Vidarbha)

मराठवाडा आणि विदर्भात आजही अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. तर विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Weather Update) होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या