Weather Update | राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार, तर ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात एकीकडे लोक उष्णतेने हैराण झालेले असून मान्सूनची वाट बघत आहे. तर दुसरीकडे विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट जरी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), राज्यातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा लगतच्या भागांमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यामध्ये उष्णता वाढत असताना यवतमाळमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Chance of rain in this district
यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी (Weather Update) करण्यात आला आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, भंडारा, नागपूर या जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आणि धान्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहे.
वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये 23 ते 25 मे दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यानंतर या ठिकाणी तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून उशिराने येत असल्याने पावसाची आणखी वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sameer Wankhede | …म्हणून समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने चांगलंच फटकारल
- Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट
- Prithviraj Chavan | “कॅशलेस इंडिया हे मोदींचं दिवास्वप्न…”; नोटबंदी प्रकारावरणावरून पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर खोचक टीका
- RBI Governor Shaktikant Das | …म्हणून दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्यात आल्या; RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया
- Nitesh Rane | “पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MsbFEX
Comments are closed.