Weather Update | राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा कडाका (Heat Wave) वाढताना दिसत आहे. तर, कुठे ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीतील पिकांवर आणि मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये ढगाळ वातावरण असले तरी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे.

राज्यामध्ये आजपासून (1 एप्रिल) पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. परंतु, राज्यामध्ये ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडणार नसल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची लवकरात लवकर काढणी सुरू करावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. कारण पाच एप्रिलनंतर राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याचा अंदाज आहे.

6 एप्रिलपासून राज्यात पावसाची शक्यता (Chance of rain in the state from April 6)

राज्यामध्ये 6 एप्रिलपासून ते 9 एप्रिलपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मुंबईसह कोकणातील चार जिल्हे त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.