Weather Update | राज्यात तापमानात घसरण, तर हरियाणामध्ये 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरणामध्ये (Weather) सातत्याने बदल होत आहे. राज्यासह देशामध्ये कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबई पुण्यामध्ये देखील थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यामध्ये दिवसेंदिवस तापमानात घसरण होत चालली आहे. दरम्यान, पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाची चटके जाणवत आहे. अशा परिस्थितीत राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 11 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. ग्रामीण भागामध्ये थंडीची हुडहुडी चांगलीच वाढत आहे. तर, मुंबई पुण्यामध्ये देखील तापमानात घट होत आहे.
उत्तर भारतातही तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. दरम्यान, उत्तर भारतामध्ये पुढील 48 तासात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. हरियाणामधील नारनौल या ठिकाणी 2.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, हरियाणामधील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खालीच आहे.
राज्यात वाढलेली थंडी शेतकऱ्यांना थोडा दिलासा देत आहे. कारण रब्बी पिकांसाठी ही थंडी चांगली आहे. वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांना गहू, मक्का आणि इतर पिकांवर मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकातून फायदा होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार – उपमुख्यमंत्री
- Eknath Shinde | “विरोधी पक्षनेत्यांच्या…” ; विरोधकांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
- Winter Session 2022 | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची सभागृहात मागणी
- Sushma Andhare | उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला, मंत्री गुवाहाटीला ; सुषमा अंधारेंचा टोला
- Winter Session 2022 | …तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासीत झाला पाहीजे – उद्धव ठाकरे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.