Weather Update | राज्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Weather Update : देशासह राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पाऊस ( Rain ) आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याचा परिणाम राज्यातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने ( Weather Department ) दिला आहे.

राज्यामध्ये पुणे, नागपूर औरंगाबादच्या तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. या ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. राज्यामध्ये पुढील आठ दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज ( Weather Update Maharashtra ) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Department warns that cold will increase in Maharashtra

सध्या देशात विचित्र वातावरण तयार झाले आहे. कुठे थंडी तर कुठे अवकाळी पाऊस बरसत आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे, आवाहन हवामान विभागाकडून ( Weather Department ) सातत्याने केले जात आहे.

हवामान विभागाने ( Weather Department Maharashtra ) दिलेल्या माहितीनुसार ( Weather Update Maharashtra ) , बुधवार आणि गुरुवारी उत्तर भारतामध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारनंतर राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात आजही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.

महत्वाच्या बातम्या