Weather Update | राज्यात पावसाचा अंदाज, उन्हाच्या झळा कमी होणार?

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. पहाटे थंडी (Cold) चा कडाका तर दुपारी उन्हाच्या झळा (Summer heat) चांगल्या जाणवायला लागल्या आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. अशात महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान काही ठिकाणी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा (Rain warning in most parts of the state)

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या आसपास पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, उन्हाळा सुरू होण्याआधी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस पडू शकतो.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली होती. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा येथील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणामध्ये देखील पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ठिकाणी सरासरी पेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार(Weather Update), यंदा पुण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 147 वर्षातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुण्याचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून म्हणजेच चार मार्चपासून राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.