Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. या अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील रब्बी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange alert in ‘this’ district including Pune)
छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
उद्या (17 मार्च) अहमदनगर, हिंगोली, यवतमाळ, परभणी, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज जारी करण्यात आला आहे. तर शनिवारी (18 मार्च) राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.
दरम्यान, राज्यातील वातावरणात (Weather Update) बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Coconut Water | नारळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Lemon Water | दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या ‘या’ समस्या होतील दूर
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
- Uddhav Thackeray | “एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा