Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर राज्यात कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (There is a chance of heavy rain at these places)
राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान खात्याकडून पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
बंगाल उपसागराच्या अग्नेय भागामध्ये शनिवारपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. याच्या प्रभावामुळे या भागांत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, देशात यावर्षी एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 109 टक्के अधिक होता. उत्तर भारत आणि दिल्लीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा होता. अशात आगामी काळामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया “या” तारखेला घेणार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण असणार याचा निर्णय
- Rohit Pawar | सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची एकांतात चर्चा; राजकीय वर्तुळात तर्क – वितर्क
- Sanjay Raut VS Nana Patole | नाना पटोलेंना त्यांचा पक्ष गांभीर्याने घेत नाही, मग आपण का घ्यायचं?- संजय राऊत
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (ESIS) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
- Sudhir Mungantiwar | “राष्ट्रीय दर्जा गेलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असेल?”: सुधीर मुनगंटीवार