Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट, पाहा हवामान अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. कुठे पाऊस पडत आहे. तर, कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुढचे चार दिवस पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उष्णतेची तीव्रता देखील कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘या’ ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट (Unseasonal rain at ‘this’ place)
राज्यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे. त्याचबरोबर धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रायगड, मुंबई, पालघर, रत्नागिरी, बीड, जालना, धाराशिव, सांगली, लातूर, बुलढाणा, अमरावती, वाशिम, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या भागांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, गेल्या 24 तासामध्ये मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी (Weather Update) लावली होती. तर काही ठिकाणी वाऱ्यासह गारपीट झाली. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)
राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jalyukta Shivar | महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! तर जलसंवर्धनात महाराष्ट्र अव्वलस्थानी!
- Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद
- Job Opportunity | राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Sharad Pawar | ‘लवकरच मुख्यमंत्री बदलणार’ संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…
- CAPF Recruitment | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
Comments are closed.