Weather Update | राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने (Unseasonal rain) राज्यात थैमान घातले आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट (Unseasonal rain crisis again in ‘this’ area of the state)

राज्यामध्ये नाशिक, अहमदनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, नागपूर, अकोला, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिट आणि वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

आज (20 मार्च) मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची (Weather Update) शक्यता आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीतील गहू, हरभरा, मूग इत्यादी पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानाचे पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात (Weather Update) सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या