Weather Update | राज्यात वाढणार उन्हाचा पारा, पाहा हवामान अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स (Western Disturbance) सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर भारतासह देशातील काही ठिकाणी पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणि शुक्रवारी देशातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात वाढणार उन्हाचा पारा (The temperature will rise in the state)
राज्यामध्ये सोमवारी (27 मार्च) तापमानाचा पारा 31 ते 36 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे भाग वगळता देशातील उर्वरित भागांमध्ये उन्हाचा पारा हळूहळू वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या भागांमध्ये 26 ते 29 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. या भागातील बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम, ओडिसा आणि झारखंड या भागांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)
राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Job Opportunity | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Health Tips | निरोगी आणि मजबूत आतड्यांसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे समावेश
- Job Opportunity | एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (AIC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.