Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा पारा, वाचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्यानंतर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा (Temperature) वाढत चालला आहे. राज्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

राज्यामध्ये आज (28 मार्च) उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. तर उद्यापासून (29 मार्च) विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यामध्ये कमाल तापमानात चढ-उतार (Weather Update) सुरू आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. राज्यामध्ये सोमवारी (27 मार्च) वर्धा जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. वर्धामध्ये 38.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. तर यवतमाळ, अकोला आणि अमरावती या ठिकाणी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

उर्वरित राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 32 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तर किमान तापमानात चढ-उतार (Weather Update) होत असून बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 12 अंश सेल्सिअसच्या पुढे कायम आहे. 27 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये राज्यातील नीचांकी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या भागांमध्ये 26 ते 29 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या भागातील बहुतांश ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम, ओडिसा आणि झारखंड या भागांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.