Weather Update | राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. तर, कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rains) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा विजांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा (Hail) अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता (Chance of rain in Vidarbha and Marathwada)

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात पुढील पाच दिवस पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. मराठवाड्यामध्ये गुरुवार (26 एप्रिल) आणि शुक्रवार (27 एप्रिल) पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर, विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. तर, कमाल तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसने घसरण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस राज्यामध्ये उष्णतेची लाट (Weather Update) येणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात (Due to unseasonal rains, farmers in the state are in trouble)

राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांना अवकाळी पावसाने (Weather Update) झोडपलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतीतील आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा, फळबागा, गहू, मक्का, मोहरी, ज्वारी इत्यादी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. तसेच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.