Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मान्सूनबाबत (Monsoon) मोठी अपडेट समोर आली आहे. 04 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मान्सूनसाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 09 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Cyclone formation has occurred in the Arabian Sea
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी किनारपट्टीवर आर्द्रता वाढून कोकण विभागात आठवड्याच्या शेवटी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला नसला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Odisha Train Accident | रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र
- Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या
- Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
- Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी
- Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JluKZ1