Weather Update | वातावरणातील बदलामुळे नागरिक हैराण, पाहा आजचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात अवकाळी पावसाचे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. अवकाळी पाऊस कमी झाला असला तरी वाढत्या तापमानाने नागरिकांना हैराण करून टाकलं आहे. अशा परिस्थितीत 17 मे पासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बहुतांश भागांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता (Weather Update) आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर बीड, जालना, जेऊर, परभणी, मालेगाव, सोलापूर, जळगाव, नांदेड या ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या पार होता.

महाराष्ट्रामध्ये  उकडा वाढताना दिसत आहे. मात्र, राज्यासह देशात सध्याच्या घडीला उष्णतेची लाट येणार नसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परंतु तापमान चाळिशीच्या घरात राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने (Weather Update) दिला आहे. राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे.

दरम्यान स्कायमेट आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्ये 4 जून पासून मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 9 जून ते 15 जून पर्यंत मान्सून धडकण्याचे चिन्ह दिसतं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.