Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामध्ये 15 ते 18 मार्च दरम्यान पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता (Weather Update) आहे. राज्यामध्ये येत्या पाच दिवसात विजांच्या कडकडांसह अवकळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), राज्यात पालघर, मुंबई, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडांसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange alert in ‘these’ districts including Pune)

राज्यात पुण्यासह अहमदनगर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 16 मार्च रोजी विजांच्या कडकडांसह पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या