Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर, काही ठिकाणी गारपिटीने (Hail) धुमाकूळ घातला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत पावसासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place in the state)

राज्यामध्ये विदर्भात 30 आणि 31 मार्च त्याचबरोबर 1 एप्रिल रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. तर, मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह कोकणातील चार जिल्हे आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे. काश्मीर व्हॉली, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी, गंगोत्री, शिमला, मनाली, डेहरादून आणि अमृतसर या ठिकाणी आज पासून तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यामध्ये कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे (Weather Update) उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य राजस्थानमध्ये समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.