Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. पश्चिम विदर्भसह अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उर्वरित कामे लवकरात लवकर उरकून घ्यावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात येत आहे. कारण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार (Weather Update), आजपासून राज्यात कोरडे वातावरण राहील. तर विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस तापमानाचा पारा 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. तर 14 ते 16 मार्च दरम्यान विदर्भात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे, आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसापासून राज्यातील वातावरणात खूप बदल झाला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी थंड वातावरण आणि दुपारच्या वेळी ऊन तापू लागले आहे. या बदलत्या वातावरणाचा (Weather Update) परिणाम थेट जनसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.