Weather Update | कुठे ऊन तर कुठे पावसाचा इशारा, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गर्मीमुळे नागरिक हैराण होऊन गेले आहे. राज्यात एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Warning of rain in some places and sun in some places

विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुढच्या आठवड्यात पुण्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात देखील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं.

वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये 24 ते 25 मे दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यानंतर या ठिकाणी तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून उशिराने येत असल्याने पावसाची आणखी वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यामध्ये वेगळचं वातावरण (Weather Update) अनुभवायला मिळालं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर एप्रिल महिन्यात पावसाने उच्चांक गाठला. त्यानंतर मे महिन्यामध्ये सुरुवातीला पाऊस पडला त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली. या बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण होऊन गेले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45pXGIx