Weather Update | पुढचे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे, किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल बघायला मिळत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात (Temperature) घट झाली आहे. अशात हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा किमान तापमानात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं राज्यात पुन्हा एकदा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने मुंबईकरांना पुढचे दोन दिवस स्वेटर आणि जॅकेट पुन्हा बाहेर काढावे लागणार आहे. कारण मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

येत्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतील काही भागांमध्ये किमान तापनात घट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर भारतातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या