Weather Update | बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी संकटात, उत्पादनात घट होण्याची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वारंवार वातावरणात (Weather) बदल होताना दिसत आहे. यामुळे कुठे थंडीचा (Cold) कडाका तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानाचा जनसामान्याच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तर, या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे.

सतत बदलत्या वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कापूस, तूर, हरभरा इत्यादी पिकांचे 20 ते 25 टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याला नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यात आता परत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. या भागातील काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानात घसरल झाल्याचे दिसून आले आहेत. तर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मात्र, विदर्भातही थंडीचा जोर कायम आहे. अशा बदलत्या वातावरणामध्ये राज्यातील शेतकरी चिंतेचा सापडला आहे. कारण या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसणार आहे. त्याचबरोबर कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतन सापडले आहे. कारण यावर्षी कोकणात थंडी उशिराने सुरू झाली होती. त्यामुळे सध्याचे थंडी आणि वातावरण पाहता यावर्षी हापूस मोसम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या