Weather Update | राज्यात तापमानाचा पारा घसरला, तर उत्तर भारतात वाढली हुडहुडी

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये वातावरणात (Weather) सतत बदल होत आहे. यामध्ये कुठे ढगाळ वातावरण तर कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरत चालला आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतातही चांगली थंडी जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवत आहेत.

देशामध्ये अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थंडीचा कहर वाढला आहे. डोंगरापासून मैदानी भागापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. दरम्यान, उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात पुढील तीन ते चार दिवस दाट धुके पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील काही भागांमध्ये तापमान दोन ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

राज्यामध्ये देखील थंडीचा पारा वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 8 ते 11 जानेवारी दरम्यान राज्यात अनेक भागात तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यामध्ये थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 9 अंशावर येऊन पोहोचला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी तापमानात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. पुणे आणि मुंबईमध्येही चांगलीच थंडी वाढत चालली आहे. पुण्यामध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या