Weather Update | राज्यात थंडी वाढण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे, तर कुठे थंडी (Cold) ची हुडहुडी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज (3 फेब्रुवारी) रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे.

राज्यामध्ये सध्या आकाश निरभ्र आहे. अनेक भागात जोरदार वारे वाहत आहे. त्यामुळे तापमानात घट होताना दिसत आहे. राज्यात धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणी दहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील उर्वरित भागात तापमानाचा पारा 10 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. राज्यात रत्नागिरीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये 35.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), तमिळनाडूतील दक्षिण भागासह केरळमधील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील समुद्रकिनारी भागामध्ये हवामानाची परिस्थिती बिघडू शकते.

दरम्यान, या बदलत्या हवामानाचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या